32 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeटॉप न्यूजVIDEO : मंत्री जयंत पाटलांनी हातात लाऊडस्पीकर घेतला, अन् तळागाळात फिरून लोकांना...

VIDEO : मंत्री जयंत पाटलांनी हातात लाऊडस्पीकर घेतला, अन् तळागाळात फिरून लोकांना सतर्क केले

टीम लय भारी

सांगली : आपत्तीच्या काळात सरकारी यंत्रणा, ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांच्याकडून लोकांना सतर्कतेच्या सुचना केल्या जातात. पण सांगली परिसरातील जनतेला निराळाच अनुभव आला. चक्क जलसंपदा मंत्री जयंत पाटील हातात लाऊडस्पीकर घेऊन लोकांना सुचना करीत होते ( Jayant Patil alerted to people in Sangli )

सांगली, सातारा व कोल्हापूर परिसरात गेल्या वर्षी महापूराने थैमान घातले होते. प्रचंड नुकसान झाले. हजारो लोकांचे संसार उघड्यावर आले. त्या पार्श्वभूमीवर यंदा असे होऊ नये म्हणून जयंत पाटील खबरदारी घेत आहेत. त्यासाठी ते मैदानात उतरले आहेत ( Jayant Patil visits at villages ).

सध्या पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पूराचे संकट घोंगावू लागले आहे. या अनुषंगाने जयंत पाटील यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. त्यासाठी ते स्वतः नदीकाठच्या गावात पोहोचले. त्यांनी नागरिकांना धीर दिला ( Jayant Patil told safety measures to people in Sangli ).

हे सुद्धा वाचा

Jayant Patil : जयंत पाटील मुंबईवरून इस्लामपुरला परतले, अन् कार्यकर्ते भावनिक झाले

राजेश टोपे म्हणतात, आरोग्य यंत्रणा आंतरराष्ट्रीय व कार्पोरेट दर्जाची करणार

अजितदादा म्हणाले, जयंत पाटील माझ्यावर कारवाई करतील

मंत्री जयंत पाटील यांचा विनम्रपणा, सामान्य लोकांच्या भेटीसाठी विधानभवनातून आले रस्त्यावर !

उद्धव ठाकरे, जयंत पाटील रमणार बालपणीच्या शाळेत

संभाव्य पूराचा धोका लक्षात घेऊन सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना बोटी दिल्या आहेत. वाळवा तालुक्यातील वाळवा व शिरगाव या गावांना आज पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते बोटी प्रदान करण्यात आल्या. यावेळी पाटील यांनी संभाव्य पूरपरिस्थितीबाबत नागरिकांना स्वतः माहिती दिली.

mahadev Jankar's follower
जाहिरात

‘कोरोना’ असो वा महापूर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील नेहमीच सांगलीकरांच्या मदतीला धावून आले आहेत. मागील वर्षी याच महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात महाप्रलयंकारी पूर आला होता. त्यावेळीही जयंत पाटील यांनी स्वतःला झोकून देऊन काम केले होते ( Jayant Patil was helped people in deluge).

बचावकार्य, मदतकार्य त्यांनी केले होते. अन्न वाटप व इतर अत्यावश्यक वस्तूंचे वाटप त्यांनी केले होते. सांगलीकरांचे अश्रू पुसण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले होते. सांगलीमध्ये ‘कोरोना’चा शिरकाव झाला त्यावेळीही पालकमंत्री जयंत पाटील यांनी तात्काळ हालचाली केल्या. इतकेच नाही तर, जिथे ‘कोरोना’चे रुग्ण आढळले त्या हॉटस्पॉट परिसरातही पालकमंत्री जयंत पाटील ग्राऊंड झिरोवर गेले होते ( Jayant Patil helps to people in Corona pandemic ). संभाव्य पूरपरिस्थितीच्या निमित्ताने पुन्हा एकदा जयंत पाटील जनतेला धीर देण्यासाठी सरसावले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी आमचे ट्विटर अकाऊँट फॉलो करा

Mahavikas Aghadi

lay bhari
येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी