35 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमुंबईशरद पवारांच्या बंगल्यावर ‘कराड’वरून आला कोरोना

शरद पवारांच्या बंगल्यावर ‘कराड’वरून आला कोरोना

टीम लय भारी

मुंबई : शरद पवारांचा ‘सिल्व्हर ओक’  हा बंगला व परिसरात तब्बल १२ जणांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. खबरदारीचे चोख उपाय केलेले असतानाही पवारांच्या बंगल्यावर ‘कोरोना’ कुठून आला याविषयी सवाल उपस्थित झाला आहे ( Corona virus arrived at Sharad Pawar’s house ).

‘लय भारी’ला मिळालेल्या माहितीनुसार कराड येथून पवारांच्या निवासस्थानी ‘कोरोना’चे आगमन झाले आहे. गेल्या आठवड्यात शरद पवार पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते ( Corona virus came from Karad at Sharad Pawar’s house ).

पवारांच्या प्रमुख उपस्थितीत कराड येथे ‘कोरोना’ची आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला मोठ्या संख्येने अधिकारी व लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती. परंतु सामान्य लोक व कार्यकर्तेही यावेळी आले होते.

पवारांच्या भोवती लोकांचा मोठ्या प्रमाणात गराडा पडला होता. यावेळी पवार यांच्या सुरक्षा रक्षकांनी लोकांना आवरले होते. यातील तीन सुरक्षा रक्षकांना आता ‘कोरोना’ची लागण झाल्याचे आढळून आले आहे ( Sharad Pawar’s body guard tested Corona Positive ).

हे सुद्धा वाचा

शरद पवारांच्या बंगल्यावर ‘कोरोना’, १२ रूग्ण सापडले

शरद पवारांकडून विजयसिंह मोहिते पाटलांना ‘डोस’

खळबळजनक : शरद पवार, राजेश टोपे यांच्या दौऱ्याच्या तोंडावरच सातारा प्रशासनाकडून भयानक घोडचूक

VIDEO : मंत्री जयंत पाटलांनी हातात लाऊडस्पीकर घेतला, अन् तळागाळात फिरून लोकांना सतर्क केले

राजेश टोपे म्हणतात, आरोग्य यंत्रणा आंतरराष्ट्रीय व कार्पोरेट दर्जाची करणार

या तीन सुरक्षा रक्षकांमुळे पवार यांच्या घरी काम करीत असलेल्या अन्य दोघाजणांनाही ‘कोरोना’ची लागण झाली आहे.

कराड येथील आढावा बैठकीमध्ये साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे सुद्धा सहभागी झाले होते. त्यांनाही याच वेळी ‘कोरोना’ची लागण झाली असावी असा कयास बांधला जात आहे ( Balasaheb Patil tested Corona Positive ).

कराड येथील बैठकीच्या वेळी कुणीतरी ‘कोरोना’बाधित व्यक्ती सहभागी झाली असावी, आणि त्यातून हा संसर्ग पसरला असावा असे आता बोलले जात आहे.

mahadev Jankar's follower
जाहिरात

सुदैवाने शरद पवार व त्यांच्या कुटुंबातील सगळ्यांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. परंतु पवारांच्या निवासस्थानापर्यंत ‘कोरोना’ने मजल मारल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंता पसरली आहे.

सातारा, सांगली व कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांमध्ये ‘कोरोना’ची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. या ठिकाणी ‘कोरोना’ नियंत्रित करण्याची गरज असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही म्हटले आहे ( Rajesh Tope worried about Corona outbreak in Western Maharashtra ).

राष्ट्रवादीच्या सर्व बैठका रद्द

शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज (मंगळवारी ) बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु पवार यांच्या निवासस्थानी ‘कोरोना’ने शिरकाव केल्यामुळे या सगळ्या बैठका रद्द करण्यात आल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले ( NCP has canceled all meetings today ).

ताज्या बातम्यांसाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

Mahavikas Aghadi

lay bhari
येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी