29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeटॉप न्यूजशरद पवार म्हणाले, सरकार वाचवविण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंची

शरद पवार म्हणाले, सरकार वाचवविण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंची

टीम लय भारी

नवी दिल्ली : अडीच वर्षांपूर्वी आमच्या पक्षाचे आमदार फुटले होते. हरियाणात आमदारांना ठेवले होते. त्यामुळे मी स्वतः लक्ष घालून सरकार वाचविले होते. आता शिवसेनेचे आमदार फुटलेले आहेत. त्यामुळे सरकार वाचविण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांची आहे, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद द्यायचे असेल तर तो निर्णय उद्धव ठाकरे घेऊ शकतात, असेही पवार म्हणाले. माझे शिवसेनेच्या नेत्यांसोबत बोलणे झाले आहे. त्यांच्या अंतर्गत कलहाबाबत ते दुपारपर्यंत निर्णय घेतील. त्यानंतर ते संध्याकाळी आमच्यासोबत चर्चा करतील, असेही पवार यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सध्याच्या सरकारमध्ये काम करण्यास काँग्रेस व राष्ट्रवादीला काहीही अडचण नाही. तिन्ही पक्षांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारीही उद्धव ठाकरे यांची आहे. कारण मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे आहे, असेही पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा :

Super EXCLUSIVE : फुटलेल्या गटातील 22 आमदारांना मिळणार मंत्रीपदे, 36 आमदार फुटले !

एकनाथ शिंदे निष्ठावंत शिवसैनिक, ते शिवसेना सोडणार नाहीत : संजय राऊत

EXCLUSIVE : शिवसेनेचे ३५ आमदार भाजपच्या संपर्कात

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी