27.9 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमंत्रालयपीडबल्यूडीच्या सचिवपदाची जबाबदारी उल्हास देबडवार यांच्याकडे

पीडबल्यूडीच्या सचिवपदाची जबाबदारी उल्हास देबडवार यांच्याकडे

टीम लय भारी

मुंबई :  सार्वजनिक बांधकाम विभागाचे ( पीडब्ल्यूडी ) सचिव सी. पी. जोशी नुकतेच निवृत्त झाले. त्यामुळे या पदाचा अतिरिक्त कारभार उल्हास देबडवार यांच्याकडे देण्यात आला आहे ( Ulhas Debadwar has taken additional charge of PWD secretary ).

पीडबल्यूडीच्या सचिवपदाची जबाबदारी उल्हास देबडवार यांच्याकडे

उल्हास देबडवार हे सध्या पीडब्ल्यूडीच्या नागपूर विभागाचे मुख्य अभियंते आहेत ( Ulhas Debadwar works as a Chief Engineer for Nagpur region ). सचिवपदाचा अतिरिक्त कारभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. परंतु सचिवपदाच्या पदोन्नतीसाठी ते पात्र आहेत. पदोन्नतीची त्यांची फाईल सध्या सामान्य प्रशासन विभागात आहे.

सामान्य प्रशासन विभाग व मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाल्यानंतर सचिवपदाची पूर्ण वेळ जबाबदारी देबडवार यांच्याकडे दिली जाईल, अशी शक्यता सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना व्यक्त केली ( Ulhas Debadwar due for promotion as secretary ).

Mahavikas Aghadi

पीडब्ल्यूडीमध्ये तीन सचिव

पीडब्ल्यूडीमध्ये अभियंता प्रवर्गातून दोन सचिव नेमले जातात, तर आयएएस प्रवर्गातून एक सचिव नेमला जातो. देबडवार यांच्याकडे पीडब्ल्यूडीतील रस्ते विभागाची जबाबदारी आहे, तर बांधकाम विभागाच्या सचिवपदावर ए. ए. सगणे ( A. A. Sagane is secretary for PWD ) हे कार्यरत आहेत. हे दोन्ही अधिकारी अभियंता प्रवर्गातील आहेत. या दोन्ही पदांपेक्षा वरिष्ठ पद असलेल्या अपर मुख्य सचिव पदावर मनोज सौनिक कार्यरत आहेत ( Manoj Sounik works as Additional Chief Secretary ).

भाजपच्या कार्यकाळापासून IAS अधिकाऱ्याची नियुक्ती

पीडब्ल्यूडीसाठी पूर्वीपासून सचिव दर्जाची दोन पदे होती. ही दोन्ही पदे अभियंता प्रवर्गातून भरली जायची. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याकाळात वरिष्ठ IAS  अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला ( Devendra Fadnavis was created new post for IAS rank officer in PWD). त्यावेळी आनंद कुलकर्णी यांची पहिली नियुक्ती केली होती.

छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच्या काळात या खात्यात बराच भ्रष्टाचार झाला होता. महाराष्ट्र सदन घोटाळा उघडकीस आला होता. भुजबळ यांना त्यामुळे तुरूंगातही जावे लागले होते. त्याच दरम्यान, वांद्रे येथील शासकीय विश्रामगृहात जवळपास 450 मोजमाप पुस्तिका दडविल्याचे प्रकरण उजेडात आले होते.

या मोजमाप पुस्तिकांमुळे कंत्राटदार व अधिकारी यांच्यातील मिलीभगत उघड झाली होती. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी फडणवीस यांनी पीडब्ल्यूडी खात्यात वरिष्ठ आयएस अधिकाऱ्यासाठी एका पदाची निर्मिती केली होती.

हे आवर्जून वाचा

अशोक चव्हाणांच्या राज्यपाल भेटीने उलटसूलट चर्चा सुरू

देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटलांकडून मराठा आरक्षणाबाबत अपप्रचार; अशोक चव्हाण संतापले

Super EXCLUSIVE : मंत्र्यांची कार्यालये, बंगल्यांवर करोडोंची उधळपट्टी; देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासाठीही कोटीचा चुराडा

मंत्रालय कॅन्टीनमधील जेवणात सापडले झुरळ

जनतेच्या कामांसाठी उपाशीपोटी मंत्रालयात धावपळ करणाऱ्या आमदारांची आरोग्य मंत्र्यांच्या दालनाच तब्येत बिघडली

आमदार रोहित पवारांचा कमालीचा विनम्रपणा, मंत्रालयात चक्क व्हरांड्यात बसले

देबडवार कार्यक्षम अधिकारी

उल्हास देबडवार हे मनमिळाऊ व कार्यक्षम अधिकारी म्हणून पीडब्ल्यूडीमध्ये परिचित आहेत. परंतु पदोन्नतीअगोदरच त्यांना सचिवपदाची सूत्रे दिल्याने मंत्रालयात दबक्या आवाजात आक्षेपवजा चर्चा सुरू आहे. पदोन्नती झाल्यानंतरच त्यांच्याकडे या पदाची सूत्रे द्यायला हवी होती, अशी भावना सूत्रांनी व्यक्त केली.

 ताज्या बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी