30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeटॉप न्यूजविलीनीकरणाचा अहवाल मंजूर न झाल्यास पुन्हा आक्रमक आंदोलनाचा इशारा

विलीनीकरणाचा अहवाल मंजूर न झाल्यास पुन्हा आक्रमक आंदोलनाचा इशारा

टीम लय भारी

मुंबई : बरेच महिने झाले एसटी कर्मचऱ्यांच्या योग्य त्या मागण्या पूर्ण होत नसल्याने एसटी कर्मचारी विलीनीकरणाचा प्रश्न पुन्हा उभा राहिला आहे. मात्र आता यावर पुन्हा न्यायलायात याचिका दाखल झाली असून आता अंतिम निर्णय काय असेल यावर सर्वांचे लक्ष लागले आहे(Warning of aggressive agitation, if ST merger report is not approved).

एसटी विलीनीकरणासंदर्भात राज्य सरकारच्या समितीने १२ फेब्रुवारीला उच्च न्यायालयाने अहवाल सादर केला असून, त्यासंदर्भात २२ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा मुंबईत एसटी कर्मचाऱ्यांची गर्दी वाढण्याची शक्‍यता वर्तवली जात असून तीव्र आंदोलन होण्याची शक्यता असते. आणि या विलीनीकरणाचा अहवाल नकारात्मक आल्यास एसटी कर्मचारी आंदोलन होणार हे खर आहे. आणि अशी दाट शक्यता समोर येत आहे. आणि या एसटी विलीनीकरण संदर्भात पुन्हा एकदा पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिस बंदोबस्त वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे(The state government’s committee on ST merger submitted its report to the High Court on February 12).

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हा संप बेकायदेशीर असल्याचे सांगूनही ते आंदोलनावर ठाम आहेत.

हे सुद्धा वाचा

आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्या, एसटी कर्मचाऱ्यांची मागणी

पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा स्वत: पुढं जाऊन संप मिटवा, पडळकरांचा परबांना सल्ला

६३ हजार संपकरी एसटी कर्मचारी वेतनापासून राहणार वंचित

Maha : State Transport Employees’ Strike enters fourth month as deadlock continues

राज्य सरकारच्या वतीने सादर केलेल्या अहवालावर २२ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. हा अहवाल अनुकूल असल्याची आशा एसटी कर्मचाऱ्यांना आहे. या सुनावणीनिमित्त राज्यभरातून अनेक एसटी कर्मचारी मुंबईत जमण्याची शक्‍यता आहे असे मिडिया रिपोर्ट नुसार समजले जात आहे. त्यामुळे या संपकऱ्यांना मुंबईच्या वेशीवर थांबवण्याची तयारी पोलिसांनी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी