37 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeजागतिकजपानच्या माजी पंतप्रधानांवर जिवघेणा हल्ला

जपानच्या माजी पंतप्रधानांवर जिवघेणा हल्ला

टीम लय भारी

टोकीयो:जपानचे माजी पंतप्रधान शिंजे आबे यांच्यावर आज सकाळी जिवघेणा हल्ला झाला. नारा शहरामध्ये ही धक्कादायक घटना घडली. एका इलेक्शन कॅंपेन दरम्यान ही घटना घडली. नारा मेडिकल युनिवर्सिटी हाॅस्पिटलमध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे.

हल्लेखोराला अटक केली आहे. त्याचे नाव यामागामी तेत्सुया आहे. तो 42 वर्षांचा आहे. त्याला आबे यांची राजनिती पसंत नसल्याने त्याने हा हल्ला केल्याचे कबूल केले आहे. जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा त्यांना पाहण्यासाठी रुग्णालयात गेले होते. त्यांनी त्यांची विचारपूस केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ते 67 वर्षांचे आहेत. ते लिबी डेमोक्रेटिक पार्टीचे सदस्य आहेत. 2012 ते 2020 हा त्यांचा कार्यकाळ आहे.

पंतप्रधान आबे यांची नारा शहरात सभा सुरु होती. त्याचवेळी त्यांच्या छातीमध्ये गोळी मारली. नंतर त्याच्या पाठीमागून फायरींग करण्यात आली. गोळीबार झाल्यानंतर आबे रस्त्यावर कोसळले. त्यांच्या छातीतून रक्तस्त्राव होत होता.हल्लेखोराकडे बंदूक सापडली. ती हॅंडमेड आहे. हल्लेखोर यामागामी तेत्सुया हा मेरीटाइम सेल्फ डिफेंस फोर्सचा मेंबर आहे. आबे यांच्यावर नारा मेडिकल युनिवर्सिटी रुग्णालयात उपचार सुरु आहे. जपानमध्ये रविवारी लोकसभेची निवडणूक आहे. त्यासाठी शिंजे कॅंपेन करत होते. रस्त्यावर एक छोटीसी सभा आयोजित केली होती. त्या ठिकाणी 100 जण उपस्थित होते. भाषण सुरु असतांना ही दुदैर्वी घटना घडली.

जपानच्या नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. महागाईने नागरीक त्रस्त आहेत. महिलांना घरातील खर्च परवडत नाही. अजारपणाच्या कारणामुळे त्यांना पायउतार व्हावे लागले होते.त्यांचे पंतप्रधान मोदीं बरोबर चांगले संबंध होते. मोदींच्या कार्यकाळात ते गुजरात आणि बनारस यात्रेला आले होते. 25 जानेवारी 2021मध्ये भारताने त्यांना ‘पद्मविभूषण‘ हा सर्वोच्च बहूमान देवू गौरव केला होता.

हे सुध्दा वाचा:

अमोल मिटकरी म्हणतात… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून संविधानाचा अपमान!

मनसेच्या गजाजन काळेंनी संजय राऊतांना काढला चिमटा

Exclusive : ‘लय भारी’च्या तडाख्यानंतर सरकारने जारी केले 355 कोटी रुपये

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी