30 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रब्रेकिंग ! महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल स्वस्त

ब्रेकिंग ! महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल स्वस्त

टीम लय भारी

मुंबईः महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करण्याचा निर्णय आज कॅबिनेटच्या बैठकीत झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्रात पेट्रोल 5 रुपये प्रती लिटर स्वस्त, तर डिझेल 3 रुपये प्रती लिटर स्वस्त करण्यात आले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आज मंत्री मंडळाच्या विस्तारापूर्वीच कॅबिनेटची बैठक घेतली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यापैकी हा एक महत्वपुर्ण निर्णय असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले.

आजच्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. शासनाने लोकहिताचे निर्णय घेतले आहेत. समाजातल्या सर्वच घटकांना न्याय देण्याचे काम हे शासन करणार आहे. त्याची सुरुवात आम्ही केली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. केंद्र सरकारने पेटोल डिझेलच्या करात कपात केली होती. कर कमी केला तर सर्व सामान्य माणसांना मोठा दिलासा मिळू शकतो. आपल्या राज्याने ते दर कमी केले नव्हते.

आपली आर्थिक परिस्थिती लक्षात घेवून जनतेच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या निर्णयामुळे 6 हजार कोटी रुपयांचा महाराष्ट्रात शासनाच्या तिजोरीवर भार पडणार आहे. मात्र या निर्णयामुळे जिवन उपयोगी वस्तू स्वस्त होणार आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

हे सुध्दा वाचा:

राज्यात पावसाचा कहर, बळीराजा चिंताक्रांत

शिंदे – फडणवीस सरकारचा लवकरच होणार शपथविधी

कर्मठ पुरूषी विचारांना चपराक; उच्च न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी