31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमुंबईअजितदादांनी मनुकुमार श्रीवास्तव यांचे केले तोंड भरून कौतुक; जिल्हाधिकारी, प्रांताधिकाऱ्यांकडून केली ‘ही’...

अजितदादांनी मनुकुमार श्रीवास्तव यांचे केले तोंड भरून कौतुक; जिल्हाधिकारी, प्रांताधिकाऱ्यांकडून केली ‘ही’ अपेक्षा व्यक्त  

टीम लय भारी

मुंबई : स्पष्ट व रोखठोक बोलणारा नेता म्हणून अजित पवार यांचा लौकीक आहे. एखादी बाब पटली नाही तर ते वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही फैलावर घ्यायला मागे पुढे पाहात नाहीत. पण दुसऱ्या बाजूला चांगल्या कामाचेही ते तोंड भरून कौतुक करतात. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव व या खात्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांनाही अजितदादांकडून तोंड भरून कौतुक स्विकारण्याची संधी मिळाली. अजितदादांच्या या प्रोत्साहनामुळे मंत्रालयातील महसूल अधिकारीही सध्या खुष आहेत.

अजितदादांनी मनुकुमार श्रीवास्तव यांचे केले तोंड भरून कौतुक; जिल्हाधिकारी, प्रांताधिकाऱ्यांकडून केली ‘ही’ अपेक्षा व्यक्त  
जाहिरात

राज्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्या महत्वाच्या खात्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. महसूलवाढीसाठी संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठकांचा धडाका लावला आहे. सोमवारी त्यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीला श्रीवास्तव यांच्यासह खात्याचे सगळे अधिकारी उपस्थित होते. उत्पन्न वाढविण्यासाठी महसूल विभागाने केलेल्या विविध उपाययोजनांचे विस्तृत प्रेझेंटेशनच श्रीवास्तव यांनी अजितदादांसमोर सादर केले. गौण खनिज, जमीन महसूल, मुद्रांक व परिवहन या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासाठीचे नवे मार्ग श्रीवास्तव यांनी अजितदादांना सांगितले. महसूल विभागाने निश्चित केलेल्या या ‘टार्गेट्स’वर अजितदादा बेहध खूष झाले. पण या सगळ्या उपाययोजनांची आतापर्यंत व्यवस्थित अंमलबजावणी झाली नसल्याचीही खंत त्यांनी व्यक्त केली. उत्पन्नवाढीच्या या सगळ्या बाबींविषयी माहिती तळागाळात गेली पाहीजे. महसूल विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांनी याची अंमलबजावणी करावी, आणि प्रसारमाध्यमांतून जनतेपर्यंत त्याची माहिती पोचवावी अशा सुचनाही अजितदादांनी यावेळी केल्या.

वडार, कुंभार समाजाच्या सवलती रद्द करण्यास अजितदादांचा नकार

वडार व कुंभार समाजाला प्रत्येकी २०० व ५०० ब्रासपर्यंत रॉयल्टी आकारण्याबाबत सवलत दिली जाते. ही सवलत रद्द करण्याबाबत महसूल विभागाने प्रस्तावित केले होते. परंतु ‘ही सवलत रद्द केली तर, माझा कुंभार व वडार समाज कुठे जाईल ? त्यांची गैरसोय होईल. असा कोणताही निर्णय घेऊ नका’ अशी सुचना अजितदादांनी यावेळी केली.

महसूल विभागाने आखले आहेत ‘हे’ उत्पन्नवाढीचे मार्ग

  • उद्योगांसाठी अनेकांना जमिनी दिल्या आहेत. पण त्यांच्या वापरात संबंधितांनी बदल करण्याचे ठरविले तर, विवरणपत्रानुसार येणाऱ्या किंमतीच्या २५ टक्के अधिमूल्य वसूल करण्यात येईल.
  • मुंबईतील भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनी हस्तांतरीत करताना पट्टामूल्य व हस्तांतरीत शुल्क आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. पण ही वसूली पूर्वलक्षी प्रभावाने आकारण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्यात आली आहे.
  • नागरी व बिगर नागरी क्षेत्रात सुधारित अकृषिक प्रमाण दर सन २०१६ मध्ये निश्चित केले होते. परंतु त्यास स्थगिती दिली होती. ती स्थगिती उठविण्यात आली असून तसा जीआरही निर्गमीत करण्यात आला आहे.
  • नागपूर व अमरावती विभागात असलेल्या नझूल जमिनींच्या भाडेपट्ट्यांच्या शर्तीमध्ये कोणी भंग केल्यास त्याबाबत आकारावयाच्या अनर्जित रकमेच्या दरांत सुधारणा केली आहे.
  • महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनिमय १९४७ मधील तरतुदींचे उल्लंघन करून कोणत्याही अकृषिक वापराकरिता जमिनीचे हस्तांतरण झाले असल्यास बाजारमूल्याच्या २५ टक्केपेक्षा अधिक नसेल इतके अधिमूल्य वसुल करण्याबाबत सुधारणा केली आहे.
  • भाडेपट्ट्याने अथवा कब्जेहक्काने प्रदान केलेल्या सरकारी जमिनींचे भोगवटादार वर्ग – १ मध्ये रूपांतर करणे, या संदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करणे.
  • महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या अनुषंगाने अंतिम आराखडा प्रसिद्ध झालेल्या सर्व नागरी भागात समाविष्ट जमिनींच्या संदर्भात अकृषिक आकारणीची प्रक्रिया पूर्म होवून संबंधित भोगवटादारास कळविण्यात येईल.
  • एखाद्या गावाच्या किंवा शहराच्या २०० मीटर परिघीय क्षेत्रात समाविष्ट विकसनशील क्षेत्राबाबत बिनशेती कर व रूपांतरण कराची आकारणी करणे.
  • कब्जेहक्काने किंवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या सरकारी जमिनीवरील बांधकामासाठी मुदतवाढ देण्याबाबत शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे
  • क्रीडांगण, खेळाचे मैदान, व्यायामशाळा यांच्यासाठी प्रदान केलेल्या सरकारी जमिनींचे भाडेपट्टा नुतनीकरण करणे.

बाळासाहेब थोरात आज महसूल विभागाचा आढावा घेणार

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत आज महसूल विभागाने आढावा बैठक आयोजित केली आहे. स्वभावाने शांत पण कामाच्या अंमलबजावणीमध्ये कठोर अशी बाळासाहेब थोरात यांची प्रतिमा आहे. विशेषत: ते शक्यतो कुणालाही फटकळपणे बोलत नाहीत. गोड बोलून अधिकाऱ्यांकडून उत्तम काम करून घेण्याची कला थोरात यांना अवगत आहे. या पार्श्वभूमीवर आज थोरात आपल्या खात्यातील सनदी व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कसा संवाद साधतील याविषयी अधिकाऱ्यांमध्येही कुतूहल आहे.

हे सुद्धा वाचा

‘लंडन आय’ सारखं ‘मुंबई आय’, उंचीवरून घ्या मुंबईचं दर्शन ! : सरकारचा नवा निर्णय

उदयनराजेंनी शिवरायांच्या वंशज असल्याचे पुरावे आणावेत; राऊतांनी डिवचले2020

मी कुठेच म्हणालो नाही मला ‘जाणता राजा’ म्हणा : शरद पवार

मी दाऊद इब्राहीमला दम दिला, संजय राऊतांचा गौप्यस्फोट!

Photo Feature : मंत्री अशोक चव्हाणांनी उडविले पतंग

Super EXCLUSIVE : मंत्र्यांची कार्यालये, बंगल्यांवर करोडोंची उधळपट्टी; देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासाठीही कोटीचा चुराडा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी