36 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
Homeव्हिडीओVIDEO : राजाचा मुलगा राजा नाही बनणार : शुभांगी पाटील

VIDEO : राजाचा मुलगा राजा नाही बनणार : शुभांगी पाटील

सत्यजित तांबे यांच्या बाजूने दिला असल्याचे चित्र स्पष्ट होताच शुभांगी पाटील यांनी ठाकरे गटाकडून पाठिंबा मिळण्यासाठी थेट मातोश्रीकडे मोर्चा वळवला आहे.

राजाचा मुलगा राजा नाही बनणार : शुभांगी पाटील
नाशिक पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक हालचालींना वेग आला असून
आज भाजपाच्या नेत्या शुभांगी पाटील या मातोश्रीवर दाखल झाल्या होत्या .भाजपाचा अधिकृत पाठिंबा मिळेल या आशेवर शुभांगी पाटील नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरलेला होता. मात्र भाजपाने आपला कौल काँग्रेसच्या सत्यजित तांबे यांच्या बाजूने दिला असल्याचे चित्र स्पष्ट होताच शुभांगी पाटील यांनी ठाकरे गटाकडून पाठिंबा मिळण्यासाठी थेट मातोश्रीकडे मोर्चा वळवला आहे. एक व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रसारीत करुन भाजपावर निशाना साधत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
एवढी नाट्यमय घडामोड कधीही नाशिक पदवीधर निवडणुकीत घडली नव्हती. विचित्र राजकारणाला आपण सामोरे जात असल्याचे सांगत सामान्य घरातल्या मुलीने राजकारणात पुढे येऊच नये, असे काहींना वाटत आहे. राजाचा मुलगा राजा नाही बनणार. ज्याच्यामध्ये कसब आहे, तोच राजा बनणार. राजाच्या मुलाला राजा बनविण्यासाठी माझे बलिदान देण्यात येत आहे. पण माझ्यासाठी माझे पदवीधर बांधव सोबत असून ही निवडणूक मी लढविणारच”, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.

हे सुद्धा पहा :  सत्यजित तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज; देवेंद्र फडणवीसांच्या मैत्रीचा परिणाम?

                   CM Eknath Shinde : नाशिक जिल्ह्यात शिंदे गटात पडणार फूट ?

                     Maharashtra Politics : आमदार फुटीच्या वक्तव्यावरून काँग्रेस-ठाकरे गटात ‘तू-तू.. मैं-मैं’

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी