37 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रआता गुडीपाडवा, आंबेडकर जयंतीलाही मिळणार आनंदाचा शिधा; राज्य शासनाचा निर्णय

आता गुडीपाडवा, आंबेडकर जयंतीलाही मिळणार आनंदाचा शिधा; राज्य शासनाचा निर्णय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षानंतर दिवाळी साजरी करण्यासाठी नवखे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अंत्योदय आणि केशरी कार्डधारकांना आनंदाचा शिक्षा देऊन त्यांची दिवाळी आणखी गोड करण्याचा प्रयत्न राज्यसरकारने केला होता. यासाठी रेशन दुकानांतून शंभर रुपयांत रवा, साखर, तेल, चणाडाळीचे किट दिले होते. त्यानंतर आता आणखी एक निर्णय आज (22 फेब्रुवारी) सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या राज्यमंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. गुढीपाडवा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधा पत्रिकाधारकांना १०० रूपयांत आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याचा लाभ १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना याचा लाभ होणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर ट्विट केले आहे.

हा आनंदाचा शिधा देण्याकरिता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्धारे २१ दिवसांऐवजी १५ दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना १ किलो रवा, १ किलो चनाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील १ महिन्याच्या कालावधीसाठी ई-पासद्धारे १०० रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल. ई-पासची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाणार आहे.

२०२२ मध्ये दिवाळी सणानिमित्त शिधाजिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत २७९ प्रति संच या दरानुसार ४५५ कोटी ९४ लाख आणि इतर अनुषंगीक खर्चासाठी १७ कोटी ६४ लाख अशा ४७३ कोटी ५८ लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.

हे सुद्धा वाचा : एकनाथ शिंदेंनी ओळखले ‘जबाबदारीचे भान’

२००० कोटींनी न्याय विकत घेतला ; देवेंद्र फडणवीसही व्यवहारात सामील

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंच्या पायात घातला कोलदांडा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी