34 C
Mumbai
Monday, November 13, 2023
घरमुंबईमुकेश अंबानींकडून नीता अंबानींना 'कोटी'मोलाची दिवाळी भेट

मुकेश अंबानींकडून नीता अंबानींना ‘कोटी’मोलाची दिवाळी भेट

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) म्हणजे देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती (Richest Industrialist) आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीदेखील. आजमितीला मुकेश अंबानी यांना अशक्य ते काहीच नाही. त्यामुळे त्यांनी सौभाग्यवती नीता अंबानी (Neeta Ambani) यांना दिवाळीला काय भेट (Diwali gift) दिली असेल, याची सर्वांना उत्सुकता आहे. भेटवस्तू देताना त्याचं मूल्य कधीही पाहिलं जात नाही तर देण्याऱ्याची दानत पाहिली जाते. तरीही ही भेट खुद्द मुकेश अंबानींनी दिल्यामुळे आणि तेही पत्नी नीता अंबानी यांना दिल्यामुळे ती भेट कोणती आणि भेटवस्तूची किंमत काय असेल, याची उत्कंठा सर्वांनाच आहे. तर मुकेश अंबानी यांनी नीता अंबानी यांना दिवाळीच्या निमित्ताने देशातील सर्वात महाग अशी गाडी भेट दिली आहे.

आता तुमची उत्कंठा ताणली असेल की ती गाडी कोणती? तर ती गाडी आहे रोल्स रॉईस कलिनन ब्लॅक बॅज लग्झरी एसयूव्ही (Rolls Royce Cullinan Black Badge Luxury SUV). आजमितीला ही देशातील सर्वात महागडी गाडी आहे. म्हणजे रोल्स रॉईस कलिनन बॅज गाडीची किंमत सुरू होते ती ८ कोटी २० लाखांना. ज्याला आपण शोरूम किंमत म्हणतो. म्हणजे प्रत्यक्षात नीता अंबानी यांनी भेट दिलेल्या गाडीची किंमत आहे तब्बल १० कोटी रुपये.

मुकेश अंबानींच्या गाड्या

मुकेश अंबानी हे गाड्यांचे शौकिन आहेत. सध्या त्यांच्या ताफ्यात रोल्स रॉईस कलिनन, फॅन्टम, बेन्टली, बेन्टलवी फ्लाईंग स्पर्ट, मर्सिडिज, मेबॅक S660 गार्ड, बीएमडब्लू 760Li सिक्युरिटी, रेन्ज रोव्हर, मर्सिडिज बेन्ज जी व्हॅगन्स आणि फेरारी SF90 स्ट्रँडल या गाड्या आहेत. या शिवाय इतर अनेक गाड्या आहेत.

हे ही वाचा

देशातील साडेअकरा कोटी PAN निष्क्रिय; यात तुम्ही आहात का?

सरकारी नोकरीसाठी प्रयत्नशील आहात; सावधान…आधी ही बातमी वाचा !

‘गुजरातीऐवजी मराठी पंतप्रधान करून दाखवा’

वास्तविक नीता अंबानी या रिलायन्स फाऊंडेशन्सच्या अध्यक्ष आहेत. ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळातून राजीनामा दिला. शिवाय आयपीएलमधील मुंबई इंडियन्स टीमच्या त्या सर्वेसर्वा आहेत. त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या गाड्या असून त्यांना गाड्यांची आवड आहे. तसेच त्यांनी हिऱ्यांचीही प्रचंड आवड आहे. असं असतानाही मुकेश अंबानी यांनी त्यांनी या दिवाळीनिमित्तानं खास रोल्स रॉईस कलिनन बॅज कारची भेट दिली आहे. या गाडीचा थाट श्रीमंती नाही तर राजेशाही आहे. त्यामुळे देशात खूप लोकांकडे ही गाडी आहे. त्यातच आता नीता अंबानींच्या ताफ्यात ही नवी गाडी आल्याने त्यांच्या दिवाळीच्या आनंदात आणखी भर पडली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी