36 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeराजकीयजितेंद्र आव्हाडांच्या एकुलत्या एक मुलीचा विवाहसोहळा संपन्न; रजिस्टर लग्न करत सर्वांसमोर ठेवला...

जितेंद्र आव्हाडांच्या एकुलत्या एक मुलीचा विवाहसोहळा संपन्न; रजिस्टर लग्न करत सर्वांसमोर ठेवला आदर्श

टीम लय भारी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा विवाहसोहळा पार पडला आहे(Jitendra Awhad’s only daughter’s wedding ceremony held)

एकीकडे अनेक नेते मोठ्या थाटामाटात आपल्या मुलांची लग्नं लावत असताना जितेंद्र आव्हाड यांनी मात्र अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करत सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. रजिस्टर पद्धतीने करण्यात आलेल्या या लग्नात काही मोजकेच पाहुणे उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाकडून सुधा भारद्वाज यांना मोठा दिलासा एनआयएला झटका देत ‘ही’ मागणी फेटाळली

जिओनं पुन्हा लॉन्च केले पाच नवे प्लान; ग्राहकांना होणार फायदा

जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक कन्या नताशा आव्हाडचा विवाहसोहळा रजिस्टर पद्धतीने पार पडला. बँडबाजा, वरात असा कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्दतीने पार पडलेल्या या लग्नाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. जितेंद्र आव्हाड यांनी यानिमित्ताने इतर लोकप्रतिनिधींसमोर आदर्श ठेवला आहे.

 मुलीच्या विवाहसोहळ्यानंतर बोलताना जितेंद्र आव्हाड भावूक झाल्याचं पहायला मिळालं. “२५ वर्ष आपल्या अंगा-खांद्यावर खेळलेली मुलगी आपल्या घरात नसणार ही भावना खूप वेदनादायी आहे,” असं सांगताना त्यांना अश्रू आवरत नव्हते.

MPSC : जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पदाची जाहिरात प्रसिद्ध, 27 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन

Maha Minister Awhad arrested in assault case, gets bail

 एका बापाने अशावेळी काय बोलायचं? असं सांगताना ते भावूक झाल्याचं पहायला मिळालं. “कितीही मन कठोर करण्याचा प्रयत्न केला तरी ते होत नाही, कारण घरात दिसणारी, बागडणारी, कधीतरी अंगावर धावून येणारी, ओरडणारी आता घरात नसणार…घरातील घरपण गेल्यासारखं असेल,” हे अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी