30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रआता 20 रुपयांमध्ये सर्वसामान्यांना मिळणार उत्तम आरोग्य तपासणी

आता 20 रुपयांमध्ये सर्वसामान्यांना मिळणार उत्तम आरोग्य तपासणी

टीम लय भारी

पुणे : पुण्यातील एक तरुण डॉक्टर फक्त २० रूपयात रुग्णसेवा देत आहे. डॉ. रोहीत बोरकर असे त्यांचे नाव आहे. मुख्य म्हणजे गरीब-श्रीमंत कोणीही असो प्रत्येकाला या आरोग्याचा फायदा घेता येणार आहे. आतापर्यंत पुण्यातील ६ ठिकाणी या  दवाखान्यांचे आयोजन करण्यात आले आहे (Health services will be available at cheaper rates in Pune).

या दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांचे फक्त २० रुपयांमध्ये चेकअप होणार आहे. रुग्णांच्या रक्त व इतर तपासणी सुध्दा मोफत होणार आहे. यासाठी एमबीबीएस, एम डी झालेले डॉक्टर या दवाखान्यात काम करीत  आहेत. या दवाखान्यात रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या खर्चात आर्थिक मदत मिळणार आहे. त्याचबरोबर मोफत रुग्णवाहिका सुविधा, वार्षिक आरोग्य कवच विमा, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला या सर्व सुविधा मोफत मिळणार आहेत.

खाशाबा जाधव यांनी पदक जिंकलं ; पण यश साजरा करण्यासाठी कोणीही भारतीय उपस्थित नव्हते

बाळासाहेब थोरात यांच्यामुळे घुलेवाडी येथे रुग्णालय मंजूर

Health services will abe vailable at cheaper rates
स्वस्त दरात मिळणार आरोग्य सेवा

अहिल्या हेल्थ हेल्पलाईन व सत्यशिव ग्लोबल फाऊंडेशनच्या मदतीने पुण्यात हे दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. अल्पदरात उत्तम आरोग्य सेवा देण्याचे ध्येय असल्याचे  डॉ. रोहीत बोरकर यांनी सांगितले. ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येणार आहे. येत्या काळात नाशिक, नागपूर, लातूर, औरंगाबाद या भागातही हे दवाखाने सुरू करणार असल्याचे डॉ. बोरकर यांनी सांगितले.

मंत्री एकनाथ शिंदेंचा दणका, महाबळेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई होणार

Dr Raj V Nagarkar: 1st Robotic surgeon in the world to perform 400 surgeries with versius

आतापर्यंत ४७० यशस्वी मोफत व सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रात 400 आरोग्य शिबीर घेण्यात आले आहेत. रुग्ण सेवा ओपिडी व आरोग्यसेवा वेगवेगळ्या भागात 20 व 10 रूपयात सुरू केले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी