33 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रराजू शेट्टींचा मोदी सरकारला इशारा, पायातलं हातात घेतल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही

राजू शेट्टींचा मोदी सरकारला इशारा, पायातलं हातात घेतल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही

टीम लय भारी

कोल्हापुर : पूरग्रस्तांच्या मागण्या आणि मदतीसाठी सरकार कडून होत असलेल्या दिरंगाई च्या निषेधार्थ माजी खासदार यांनी केला आहे. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी(raju shetti)यांच्या नेतृत्वाखाली आज करवीर तालुक्यातील क्षेत्र प्रयाग चिखली येथील संगमावरून जलसमाधी आंदोलनाला सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. दरम्यान पाच सप्टेंबरला होणाऱ्या नियोजित जलसमाधी आंदोलना च्या पूर्वी मदत आणि मागण्याबाबत पूर्तता न झाल्यास हजारो शेतकऱ्यांच्या बरोबरच आपणही जलसमाधी घेणार असल्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी क्षेत्र प्रयाग येथे बोलताना दिला(raju shetti warned modi government).

महापुराचा फटका बसलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांची पिक कर्ज माफी, सानुग्रह अनुदान, घर पडझड नुकसान भरपाई,आणि २०१९ मध्ये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले प्रोत्साहनपर पन्नास हजाराचे अनुदान, या आणि इतर मागण्यांबाबत ५ सप्टेंबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जलसमाधी आंदोलन दृष्टीने पदयात्रा परिक्रमेची सुरुवात आज करण्याच्या दृष्टीने पहाटेपासून क्षेत्र प्रयाग येथे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून आलेले शेतकरी यांनी गर्दी केली होती.
यावेळी येथील क्षेत्र प्रयाग येथील श्री दत्त मंदिरामध्ये सकाळी नऊ वाजता राजू शेट्टी यांनी अभिषेक घालून आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिक्रमेत सुरुवात केली.

लेकीचे गुण वाढविल्याने मुख्यमंत्रीपद गमवावे लागलेल्या नेत्याची कहाणी

दोन लाचखोर वनाधिकाऱ्यांच्या हातात बेड्या

यावेळी सभेमध्ये पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, २०१९ साली शेतकऱ्यांना योग्य वेळी मदत मिळाली मात्र सध्याच्या सरकारने मदतीसाठी दिरंगाई केल्याचा आरोप आहे आणि पूरग्रस्तांना मदत देण्या बाबत गुजरातला वेगळा न्याय आणि महाराष्ट्राला वेगळा न्याय का? असा प्रश्नही त्यांनी केंद्र सरकारला विचारला. प्रशासनाच्या गलथान कारभार आणि सरकारच्या नाकर्तेपणामुळे च पूरग्रस्तांच्या वर अन्याय झाला आहे. प्रमुख मागण्या बरोबरच पूरग्रस्त विद्यार्थ्यांना फी माफी, पुलांचे भरावे हटवणे पूरग्रस्तांचे विना अट कायमस्वरूपी पुनर्वसन, या मागण्याही पूरग्रस्तांच्या जिव्हाळ्याच्या असून त्या पूर्ण होईपर्यंत आपण मागे हटणार नसल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले व प्रयाग चिखली व आंबेवाडी पूरग्रस्तांसाठी रस्त्यावरची लढाई करणार असल्याचे सांगितले. दरम्यान पदयात्रा- परिक्रमा शिस्त सांभाळून पूर्ण करण्याची विनंतीही त्यांनी कार्यकर्त्यांना केली.

यावेळी क्षेत्र प्रयाग येथे झालेल्या सभेमध्ये प्रयाग चिखली येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब वरुटे यांनी या आंदोलनासाठी सर्वपक्षीय शेतकरी राजू शेट्टी यांच्या पाठीशी राहतील अशी ग्वाही दिली. रघुनाथ पाटील व माजी सरपंच -केवलसिंग रजपुत यांनी प्रयाग चिखली पूरग्रस्तांच्या वर झालेले अन्याय विषद करून गेली बत्तीस वर्षापासून रखडलेले पुनर्वसन मार्गी लावण्यासाठी तसेच गुराळ व्यवसाय साठी राजू शेट्टी यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती केली. करवीर पंचायत समिती सदस्य इंद्रजीत पाटील यांनी आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला, यावेळी सामाजिक संघटनेचे आबिद मुल्लानी, युवराज पाटील, शामराव मांगलेकर, अरुण मांगलेकर आंबेवाडीचे माजी सरपंच -अनिल आंबी, आदी शेतकऱ्यांनी आपल्या भाषणातून व्यथा मांडल्या.

पुणे पोलिसांकडून महिला पोलिसांसाठी खुशखबर

Raju
राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज करवीर तालुक्यातील क्षेत्र प्रयाग चिखली येथील संगमावरून जलसमाधी आंदोलनाला आज सकाळी दहा वाजता सुरुवात झाली

http://www.uniindia.com/mah-raju-shetty-to-agitate-against-inadequate-help-to-farmers/west/news/2476306.html

5 सप्टेंबर च्या जलसमाधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निघालेली पदयात्रा परिक्रमा प्रयाग येथील नदी पुलावरून प्रयाग चिखली आंबेवाडी वडणगे गावाकडे रवाना झाली. ही परिक्रमा पदयात्रा प्रयाग चिखली आंबेवाडी वडणगे निगवे या मार्गावरून शिरोळ 5 सप्टेंबर पर्यंत शिरोळ कृष्णा पंचगंगा नदी संगमावर पोहोचणार आहे.
यावेळी स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.जालंदर पाटील, वैभव दादा कांबळे, विक्रम पाटील, जनार्धन पाटील, विठ्ठल कळके, सुजित पाटील, कृष्णात पाटील, यांच्यासह तालुका व जिल्हा पातळीवरील पदाधिकारी उपस्थित होते.

प्रयाग चिखली चे पुनर्वसन होऊन बत्तीस वर्षे उलटली तरीही अद्याप भूखंडाचे प्रॉपर्टी कार्ड मिळाले नसल्यामुळे पुनर्वसन रखडले “जलसमाधी” आंदोलनानंतर आपण जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊ आणि प्रॉपर्टी कार्डाची मागणी करू जर प्रॉपर्टी कार्ड मिळाले नाही तर तेथील खुर्च्या घेऊन जाऊ असा निर्धार यावेळी राजू शेट्टी यांनी बोलून दाखविला

-प्रॉपर्टी कार्ड नाही तर खुर्च्याच आणू

सभेमध्ये राजू शेट्टी म्हणाले आम्हाला चंद्र..सूर्य नको आपत्ती निवारण निधीतून थोडी मदत पाहिजे आहे ती फक्त वेळेत द्या

-आम्हाला चंद्र – सूर्य नको….. मदत हवी

अति तातडीची मदत गुजरातला लगेच मिळते महाराष्ट्राला मात्र विलंब होतो असा वेगवेगळा न्याय देणार्या सरकारला पायातलं हातात घेतल्याशिवाय चालणार नाही
फोटो ओळी-स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जलसमाधी आंदोलनाला या पार्श्वभूमीवर आयोजित परिक्रमेची सुरुवात क्षेत्र प्रयाग चिखली येथून झाली
यावेळी आयोजित सभेत बोलताना राजू शेट्टी

-पायातलं हातात घेणार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी