30 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमुंबई'भ्रष्टाचाराचे खड्डे उघडे पडले', आशिष शेलार यांची महापालिकेच्या कर्त्याधर्त्यांवर टीका

‘भ्रष्टाचाराचे खड्डे उघडे पडले’, आशिष शेलार यांची महापालिकेच्या कर्त्याधर्त्यांवर टीका

टीम लय भारी 

मुंबई : शहरात पावसाने धुमाकुळ घालायला सुरूवात केली आहे. अगदी पहिल्या पावसात नेहमीप्रमाणे मुंबईची ‘तुंबई’ झाली, मुंबईकरांची दाणादाण उडाली आणि सत्ताधारी – विरोधकांमधील आरोपप्रत्यारोपाची गाडी पुन्हा वेग धरू लागली. दरम्यान, पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांची चाळण झाल्याचे पाहायला मिळाले आणि नेमका हाच मुद्दा लावून धरत आशिष शेलार यांनी महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांना “भ्रष्टाचाराचे खड्डे पडले” असे म्हणून बोचरी टीका केली आहे.

अॅड आशिष शेलार यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करून महापालिकेवर अनेक वर्षांची सत्ता असणाऱ्या शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला असून सद्यस्थितीतील भीषण सत्य त्यांनी उघड करण्याचा प्रयत्न केला आहे.

आमदार आशिष शेलार त्यांच्या ट्विटर पोस्टमध्ये लिहितात, “25 वर्षांत मुंबई महापालिकेने रस्ते बांधकाम आणि रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी तब्बल 21000 कोटींहून अधिक खर्च केले. तरी, सालाबादप्रमाणे पहिल्या मोठ्या पावसात रस्त्यांची चाळण झाली आहे. भ्रष्टाचाराचे खड्डे उघडे पडले असे म्हणून महापालिकेच्या कामाचा लेखाजोखा मांडून त्यांनी कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.”

पुढे शेलार म्हणतात, “25 वर्षे सत्ता असणाऱ्यांनी मुंबईकरांसाठी पहा काय करून दाखवले”, असे म्हणून सर्वसामान्य मुंबईकरांना महापालिकेच्या कर्त्याधर्त्यांच्या कामचुकारपणाची पुन्हा आठवण करून दिली आहे.

हे सुद्धा वाचा…

IPS अधिकारी वारकरी वेशात!

अबब ! IAS अधिकाऱ्याचा बेफिकीरपणा, ४ लाख गोरगरीब विद्यार्थ्यांचे अडवले ६३६ कोटी !

मुंबई महानगरपालिकेतील सार्वजनिक आरोग्य विभागात भरती सुरु

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी