35 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeराजकीयशिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी केली भाजपा महिला पदाधिकाऱ्यांना अटक करण्याची मागणी

शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी केली भाजपा महिला पदाधिकाऱ्यांना अटक करण्याची मागणी

टीम लय भारी

मुंबई : मुंबईतील भाजपा नगरसेवक कार्यालयात एका महिलेला बोलावून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी शिवसेना महिला पदाधिकारी आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी भाजपा महिला पदाधिकाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली आहे (Shiv Sena women office bearers demand arrest of BJP women office bearers).

या संदर्भात शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांचे एका शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्तांची भेट घेतली आहे. या शिष्टमंडळात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना उपनेत्या मीना कांबळी, विशाखा राऊत, शिवसेना प्रवक्ता संजना घाडी, शुभा राऊळ, शीतल म्हात्रे, विभागसंघटक सुजाता शिंगाडे व महिला लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांचा समावेश आहे.

चिपी विमानतळ सज्ज, पहिले उड्डाण ९ ऑक्टोबरला

जितेंद्र आव्हाडांनी सांगितली क्रांतिवीरांगणा हौसाक्का यांची एक आठवण

काय आहे प्रकरण 

मुंबईतील भाजपाच्या  नगरसेविकेच्या कार्यालयात एका महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न झाला. भाजपच्या एका कार्यकर्त्यानेच महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित पीडित महिला एक समाजसेविका असून भाजपाच्या कार्यालयात काही कामासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी सोबत तिची ओळख झाली. त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी पीडित महिला भाजपा कार्यालयात गेली असता आरोपीने कार्यालय बंद करून पीडित महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

आत्महत्या करणाऱ्यांचा मृत्यू कोविड मुळेच, केंद्राचे सुप्रीम कोर्टात वक्तव्य

Governors act like “rogue elephants” in non-BJP ruled states: Shiv Sena

या संदर्भात पोलिसात तक्रार केली असून देखील पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला नाही. या प्रकरणाने सध्या भाजप नगरसेवक कार्यालयात खळबळ माजली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी