31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeराजकीयमुख्यमंत्र्यांना धनुष्यबाणाचा विसर, मनसेने करून दिली आठवण

मुख्यमंत्र्यांना धनुष्यबाणाचा विसर, मनसेने करून दिली आठवण

टीम लय भारी

मुंबई : ‘मुख्यमंत्री साहेब लक्ष द्या, तुम्हाला धनुष्यबाणाचा विसर पडला आहे.’ असे पत्र मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. याचे कारण असे की, दादर परिसरात असलेले धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र गेले अनेक वर्ष बंद आहे (MNS Sandeep Deshpande has written a letter to the Chief Minister).

दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या परिसरात चालत असलेले धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र सुरु असताना, चुकीने एकदा एक बाण तत्कालीन महपौर निवास परिसरात जाऊन पडला होता. परंतु यात कुणालाही इजा झाली नव्हती, तरी देखील हे प्रशिक्षण केंद्र आदेश काढून बंद करण्यात आले (The Archery Training Center was closed by order).

मनसेचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा निशाणा, पण टास्क फोर्सच्या खांद्यावर बंदूक ठेवून

‘मुंबईचे लोकलप्रवाशी शिवपंख लावणार, अन् कामावर उडत उडत जाणार’, मनसेने सांगितले भाकीत

धनुर्विद्या शिकणारे अनेक खेळाडू आज निराशेत आहेत. त्यांना सराव करण्यासाठी देखील जागा नाही. मुख्यमंत्र्यांनी आमदार आणि सभागृह नेत्यांना आर्चरी क्लबसाठी पर्यायी जागा देण्यास सांगितले होते. आर्चरी क्लबने आमदार, नगरसेविका, सभागृह नेते, तसेच महानगरपालिकेसोबत देखील पत्र व्यवहार केला. तरी आर्चरी क्लबला ‘केराची टोपी’ दाखवण्यात आली.

 MNS Sandeep Deshpande has written a letter Chief Minister
धनुर्विद्या शिकणाऱ्या खेळाडूंनमध्ये नाराजी व्यक्त होत आहे

“आमचा सीएम जगात भारी”, मुख्यमंत्र्यांवर मनसेचा खोचक पण मजेशीर टोला

BJP leaders seek FIR against Uddhav Thackeray for remarks against Yogi Adityanath, file complaint

प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापन केली. पक्ष स्थापन करून ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह ठरवले. धनुष्यबाण हे हिंदू धर्मातील महत्वाचे प्रतिक आहे. ज्या धनुर्विद्येसाठी शिवसेना पक्ष प्रमुखाचे ऐकले जात नसेल तर शिवसेनेला आपले पक्षचिन्ह धनुष्यबाण ठेवण्याचे नैतिक अधिकार आहेत का? बाळासाहेबांची शिवसेना आता फक्त हवेतच बाण मारण्यात पटाईत आहे का? अशीच जर अवस्था खेळाडूंची झाली तर ऑलम्पिकमध्ये देशाला पदक कसे मिळणार? असे प्रश्न मनसेच्या देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर उपस्थित केले आहेत (MNS Deshpande raised Such questions to the Chief Minister).

जेव्हा हे सारे प्रकरण घडले तेव्हाच मुख्यमंत्र्यांना हे प्रशिक्षण केंद्र बंद न करता, महापौर निवास, बाळासाहेब राष्ट्रीय स्मारक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांमधील संयुक्त भिंतीची उंची वाढवून हा प्रश्न सोडवण्यात आला असता. परंतु मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिले नाही. अजून देखील वेळ हातातून गेली नाही. या कामासाठी परवानगी द्यावी आणि प्रशिक्षण केंद्र लवकरात लवकर सुरु करावे. त्याप्रमाणे लांब पल्ल्याचा सरावाकरता 100 बाय ३०० मीटरचे सुरक्षित आणि पूर्णवेळ मैदान उपलब्ध करून द्यावे. अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी