30 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeराजकीयकर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांना फोन; त्यानंतर झाली भेट

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांना फोन; त्यानंतर झाली भेट

टीम लय भारी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या काही दिवसांपासून  मोठ्या नेत्यांशी भेटीगाठी वाढल्या आहेत. शरद पवार  शुक्रवारी (ता.६) बंगळुरूच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असतांना शरद पवार यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराव बोम्मई यांची भेट घेतली. शरद पवार आणि बोम्मई यांच्यात झालेल्या या बैठकीची माहिती शरद पवार यांनी दिली आहे (Sharad Pawar has meet the Chief Minister of Karnataka).

शरद पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या या भेटीबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. तसेच पवार यांनी या भेटीमागचे कारणही सांगितले आहे. मी बंगळूरु दौऱ्यावर असताना कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा फोन आला होता. बोम्मई यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या पदाचा मान राखत त्यांच्या भेटीला जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांची भेट घेतली. त्यांच्या आदरातिथ्याबद्दल मी अभारी असून येत्या काळात दोन्ही राज्य सहकारी दृष्टीने सोबत काम करतील अशी आशा असल्याचे शरद पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे.

आदित्य ठाकरेंचा पुढाकार, मुंबईत आणखी ६ पूल उभारणार

सदाभाऊ खोत यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

Sharad Pawar has meet the Chief Minister of Karnataka
शरद पवार आणि मुख्यमंत्री बसवराव बोम्मई

शरद पवार नरेंद्र मोदी भेट

शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात 17 जुलैला पंतप्रधान कार्यालयात भेट झाली होती. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली होती. लोकसभेचं पावसाळी अधिवेशन आणि नव्या सहकार खात्याची निर्मिती या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती.

शरद पवार-नितीन गडकरी भेट

दरम्यान, शरद पवारांनी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. गेल्याच आठवड्यात नितीन गडकरी आणि शरद पवार यांचीही भेट झाली होती. नितीन गडकरी यांनी शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.

चोर चोर मावसभाऊ, अर्ध अर्ध वाटून खाऊ : सदाभाऊ खोत

Sharad Pawar invites Amit Shah to visit sugar industry institute in Pune

शरद पवार -अमित शाह भेट

शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेऊन सहकार खात्याविषयी चर्चा केली होती. सहकार क्षेत्रातील समस्यांमध्ये तातडीने लक्ष घालून सहकार मंत्री त्या सोडवण्यासाठी पावले उचलतील, या भेटीदरम्यान देशातील साखर उद्योगाची परिस्थिती आणि साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे निर्माण होणाऱ्या समस्या यावर चर्चा केली झाली होती. (Sharad Pawar had discussed cooperation with Amit Shah for the meeting).

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी