28.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयशेतकरी घरदार सोडून रस्त्यावर बसलाय मात्र कुणी ढुंकून पाहत नाही, शरद पवारांचा...

शेतकरी घरदार सोडून रस्त्यावर बसलाय मात्र कुणी ढुंकून पाहत नाही, शरद पवारांचा हल्लाबोल

टीम लय भारी

सोलापूर : येत्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकांत भाजपला खड्यासारखे बाजूला करुया, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. ते सोलापुरात कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. “हे सरकार टिकवायचे आहे. मुख्यमंत्र्यांचा सन्मान वाढवायचा आहे. हे राज्य चुकीच्या हातात द्यायचं नाही. त्यांचा (भाजपचा) अनुभव चांगला नाही. (sharad pawar talking about farmer issues)

या देशातील 60 टक्के पेक्षा लोक काळ्या मातीचे इमान राखतो. शेतकऱ्याचे हिताचे समर्थन आहे, त्याला आपली साथ आहे. शेतीमालाच्या किमतीसंबधी दिल्लीच्या बॉर्डरवर एक वर्ष आंदोलन आहे. शेतकरी रस्त्यावर घरदार सोडून बसलाय. एक वर्षांपासून आंदोलन मात्र कुणी ढुंकून पाहत नाही, असा हल्लाबोल शरद पवारांनी केला.

‘मंत्रालयात बदल्या, जमिनींच्या व्यवहारात करोडोंची उलाढाल’

एनसीबी भाजपची बटीक आहे, राष्ट्रवादीचा टोला

केंद्राकडून राज्याला रोजचा त्रास

महाराष्ट्रात आघाडीचे सरकार आहे. कुणीही काही म्हटले तरी सामंजस्यपणाने सरकार चालविले जात आहे. दिल्लीवरुन या सरकारला रोज त्रास दिला जात आहे. अनेक गोष्टींवरुन त्रास दिला जातो. केंद्र सरकार इकडचा कर गोळा करते, मात्र राज्याचा वाटा केंद्र सरकार देत नाही. आज देऊ, उद्या देऊ असं केलं जात आहे, असं शरद पवार म्हणाले.

अतिवृष्टीचे पैसे द्यायला इकडे पैसे नाहीत. मात्र केंद्र सरकार पैसे आज देतो, उद्या देतो करते. मी मंत्री असताना गुजरातमध्ये निधी देऊ नका, असे म्हणत होते. मी मात्र देश चालवायचे आहे,संकुचितपण न ठेवता मदत केली. गुजरातमध्ये मी पक्ष बघितला नाही, तिथल्या लोकांशी बांधिलकी ठेवली. इथे मात्र राज्यात परिस्थिती वेगळी आहे. येत्या स्थानिक संस्था मध्ये भाजपला खड्यासारखे बाजूला करूया, असा निर्धार शरद पवारांनी केला.

ज्या देशात सुई सुद्धा निर्माण होत नव्हती तिथे आज रेल्वेची इंजिन तयार होतात : शरद पवार

शेतकरी घरदार सोडून रस्त्यावर बसलाय मात्र कुणी ढुंकून पाहत नाही, शरद पवारांचा हल्लाबोल

I-T Raids Could Be Result Of Lakhimpur Kheri Criticism, Says Sharad Pawar

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी