27 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरव्हिडीओVIDEO : मोदींच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका पाहून अरविंद सावंत संतापले

VIDEO : मोदींच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका पाहून अरविंद सावंत संतापले

निमंत्रण पत्रिकेवर विरोधी पक्षांचे खासदार आणि आमदारांची नावे नसल्याने मोदींच्या मुंबईतील कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला आलेल्या अधिकाऱ्यांना खासदार अरविंद सावंत यांनी झापले आहे.

आज मुंबईत विविध विकासकामांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. शिंदे गट- भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात विकासकामांच्या श्रेय घेण्यावरून कलगी तुरा रंगलेला आहे. त्यातच आता निमंत्रण पत्रिकेवर विरोधी पक्षांचे खासदार आणि आमदारांची नावे नसल्याने मोदींच्या मुंबईतील कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला आलेल्या अधिकाऱ्यांना खासदार अरविंद सावंत यांनी झापले आहे.
मोदींच्या स्वागतासाठी भाजप आणि शिंदे गटाने जय्यत तयारी केली आहे. विविध विकासकामांचं उद्घाटनासाठी आलेल्या मोदींची बीकेसीमध्ये सभा आहे. मात्र या कार्यक्रमावर विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर भाजप (BJP) आणि शिंदे गटाच्या खासदारांची नावे आहेत. मात्र, खासदार अरविंद सावंत यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत नसल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी निमंत्रण द्यायला आलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना धारेवर धरले आहे. त्यामुळे विरोधकांकडून असलेल्या नाराजीचे सुर आता उमटायला सुरु झाले आहेत .

हे सुद्धा पहा : ‘पंतप्रधानांनी देशातील जनतेचा विश्वास गमावला’, काँग्रेस नेत्याचे खोचक वक्तव्य

Arvind Sawant : ‘यांची स्क्रिप्ट कोण लिहून देतं…’, अरविंद सावंताचा कडवा सवाल

मोदी सरकारने महाराष्ट्राबद्दलच्या प्रयत्नातून आणखी एक संस्था दिल्लीला हलवली! : सचिन सावंत

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी