31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रउस्मानाबादी शेळी पालन बक्कळ पैसे कमवण्याचे साधन

उस्मानाबादी शेळी पालन बक्कळ पैसे कमवण्याचे साधन

टीम लय भारी

उस्मानाबाद: महाराष्ट्रात शेळी पालनासाठी योग्य असे वातावरण आहे. अनेक शेतकरी आवडीने या व्यवसायाकडे वळतात. मात्र अनेकांना या बाबत पुरेशी माहिती नसते. त्यामुळे हा व्यवसाय करण्यास तरुण धजावत नाही. उस्मानाबादी शेळी ही शेळी व्यवसाय करण्यास उत्तम जात आहे. उस्मानाबादी शेळी ही महाराष्ट्रातील सर्वात प्रसिध्द जात आहे. महाराष्ट्रातील मांस उत्पादनात या जातीच्या शेळीचा मोठा वाटा आहे. या जातीच्या बोकडाच्या मांसाला बाजारत मोठी मागणी आहे.

उस्मानाबादी शेळीचा इतिहास :

ही शेळी उस्मानाबाद जिल्हयातील तुळजापूर तालुका आणि महाराष्ट्रातील लातूर जिल्हयातील उदगीर तालुक्यात उगम पावली. या शेळीला ‘डेक्कनी‘ असेही म्हणतात. निजामाची राजवट ही डेक्कनी राजवट म्हणून ओळखली जाते. त्यावरुन या शेळीला डेक्कनी नाव पडले. उस्मानाबाद जिल्हयाला हैदराबाद डेक्कन इस्टेटचे निजाम शासक ‘मीर उस्मान अली खान‘ हे शासक होते. ते निजाम घराण्याचे सातवे शासक होते. सुमारे 150 वर्षांपासून ही जात मराठवाडयात अस्तित्वात आहे.

आवडीचा चारा:

लसूण, वाटाणे, गवार, पिंपळाची पाने, आंबा, अशोक, कडुलिंब, बोरं, गोखरु, खेजरी, करोंडा, सलगम, बटाटा, मुळा, गाजर, बीटरुट, कोबी, फुलकोबी, नेपियर गवत, गिनी गवत, डूब गवत, अंजन गवत, सोयाबिन, स्टायलो गवत, शेंगा, बाजरी, ज्वारी, ओटस, मका, चणे, गहू, मोहरी, भुईमुग, आळसी, गहू, तांदळाचा भुसा, पेंड, बार्ली, भाज्या, सिझनला मिळणारी फळे, शिसमचा पाला, बाभळीचा पाला उस्मानाबादी जातीची शेळी आवडीने खाते.

या शेळीची वैशिष्टये :

उस्मानाबादी जातीची शेळी 4 टक्के फॅट असलेले दर्जेदार दूध देते. दूध आणि खतातून शेतकरी अतिरिक्त पैसे कमावू शकतो. कोणत्याही प्रकारच्या वातावरणात टिकून राहण्याची या जातीच्या शेळीची क्षमता असते. सहा महिन्याची शेळी सुमारे 15 किलो वजनाचे मास देते. ही शेळी एकाच वेळी दोन किंवा तीन करडू जन्माला घालतेे. वर्षातून दोनदा ती करडू जन्माला घालते. तिची रोग प्रतिकार शक्ती चांगली असते. चारा खाण्यासाठी तिला बाहेर सोडू शकतो.आवडीचा पाला गवत ती खाते. त्यामुळे या शेळीच्या खाण्यावर फारसा खर्च येत नाही. इतर जातीच्या तुलनेत हिचा गर्भधारणेचा कालावधी हा 5 महिन्यांचा असतो. या जातीची शेळी 4 महिन्यापर्यंत आर्धा ते दीड लिटर दूध देते.

विशेष माहिती :

पिल्लांना वाढीसाठी तीन महिन्यापर्यंत दूध पाजणे आवश्यक आहे. या शेळीचे मास प्रथिनांनी समृध्द असते. तुलनेने चरबी कमी असते. चामडयाला मोठी मागणी असते.दर तीन महिन्याला करडूचे वजन 100 गॅ्रमने वाढते. या शेळयांना दर्जेदार आहार दिला तर वजन अधिक वेगाने वाढू शकते. ही शेळी आकाराने मोठी असते. प्रामुखाने याचा रंग पांढरा किंवा तपकिरी ठिपके असलेला असतो. मांस आणि दूध उत्पादन या दोन्हीसाठी त्याचा चांगला फायदा असतो. तसेच ही प्रजनन क्षमता देखील चांगली असते. प्रौढ जातीच्या मादी शेळीचे वजन 32 किलो तर नराचे वजन 34 किलोपर्यंत असते.

या जातीच्या शेळया मिळण्याचे ठिकाण :

उस्मानाबाद आणि अहमदनगर जिल्हयात या जातीच्या शेळया आढळून येतात. या जातीच्या शेळया महाराष्ट्रातील उस्मानाबाद, तुळजापूर, अहमदनगर, उदगीर, लातूर, सोलनपूर, परभणी, तेलंगणा, आंध्रप्रदेश सह देशातील विविध राज्यात मिळतात.

हे सुध्दा वाचा:

वसंतराव नाईकांपासून ते शरद पवारापर्यंत प्रत्येक मराठी नेत्याने शिवसेनेला मोठे का केले?

अरे व्वा ! भारतीयांनी वाढवली ऑस्ट्रेलियातील लोकसंख्या

फडणवीसांच्या आगमनाच्या मुहूर्तावर ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी