31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeटॉप न्यूजT20 WC: भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तान संघाची घोषणा; ‘या’ खेळाडूंची नावं जाहीर

T20 WC: भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तान संघाची घोषणा; ‘या’ खेळाडूंची नावं जाहीर

टीम लय भारी

नवी दिल्ली: टी २० वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी पाकिस्तान १२ खेळाडूंची नाव जाहीर केली आहेत. यापैकी अकरा खेळाडूंचं नाव सामन्यापूर्वी निश्चित होणार आहे. २४ ऑक्टोबरला संध्याकाळी ७.३० वाजता दोन्ही संघ आमनेसामने येणार आहे. तत्पूर्वी पाकिस्ताननं आपल्या १२ खेळाडूंची नाव जाहीर केली आहेत. यात पाकिस्तानच्या शोएब मलिकला अंतिम १२ मध्ये स्थान देण्यात आलं आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये शोएब मलिकची कामगिरी पाहता त्याची निवड करण्यात आली आहे. तसेच मोहम्द हफीजचंही १२ जणांमध्ये नाव आहे (T20 WC: Pakistan team announced his squad list against India).

पाकिस्तानचा संघ

बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, हसन अली, हरीस रऊफ, हैदर अली

चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्याची स्टेडियमवर भन्नाट पोस्टरबाजी

रणवीर-दीपिका आता क्रिकेटच्या मैदानावर घालणार धुमाकूळ!

भारत विरुद्ध पाकिस्तान संघाचा सुपर १२ मधील पहिला सामना आहे. त्यामुळे हा सामना जिंकण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असणार आहे. मात्र वर्ल्डकपमधील रेकॉर्ड पाहता दोन्ही संघ आतापर्यत ५ वेळा आमनेसामने आले आहेत. पाचही वेळा भारताने विजय मिळवला आहे. तत्पूर्वी भारताने सराव सामन्यात दोन विजय मिळवले आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या संघांना पराभूत केलं आहे. त्यामुळे या सामन्यात भारताचं पारडं जड आहे.

सुपर १२ फेरीत भारताचे सामने

२४ ऑक्टोबर भारत विरुद्ध पाकिस्तान

३१ ऑक्टोबर भारत विरुद्ध न्यूझीलंड

शाहरुख खानने भाजपामध्ये प्रवेश केल्यास आर्यनला जामीनही मिळेल!

Australia vs South Africa Live Cricket Score T20 World Cup 2021: Zampa scalps two in same over, South Africa struggle

३ नोव्हेंबर भारत विरुद्ध अफगाणिस्तान

५ नोव्हेंबर भारत विरुद्ध स्कॉटलँड

८ नोव्हेंबर भारत विरुद्ध नामिबिया

टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, आर. अश्विन, शार्दुल ठाकुर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

राखीव खेळाडू- श्रेयस अय्यर, दीपक चाहर, अक्षर पटेल

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी